अंतरराष्ट्रीय

Blog single photo

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची लागण

27/03/2020

लंडन, 27 मार्च (हिं.स.) : जगभर वाढत्या करोनाच्या प्रादुर्भात धक्कादायक माहिती पुढे आली. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जॉन्सन यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. 


 यासंदर्भातील ट्विटमध्ये जॉन्सन यांनी नमूद केल्यानुसार गेल्या 24 तासांपासून त्यांच्या शरीरामध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याची काही लक्षणे दिसून आली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीमध्ये जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मी स्वत:ला पुढचे काही दिवस विलग केले आहे, असे जॉन्सन यांनी सांगितले. तसेच, कोरोनाशी लढा देण्याबरोबरच आपण सरकारी जबाबदारी देखील पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हिंदुस्थान समाचार 
Top