मुंबई : चिमुरडीची विक्री करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
11/02/2021
मुंबई , 11 फेब्रुवारी, ( हिं.स) आठ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करून दोन लाख रुपयांना विकण्यासाठी नेणाऱ्या टोळीला विरार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या चिमुकलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे.
याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 16 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या मध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या मुलीला सध्या बालसंगोपन केंद्रात ठेवण्यात आले आहे. या चिमुरडीच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले तर वडीलही तिला सोडून गेले होते. त्यानंतर तिचा सांभाळ तिचे नातेवाईक करत होते.