ट्रेंडिंग

Blog single photo

राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह 65 संचालकांना “क्लीन चीट”

18/02/2021

मुंबई, 18 फेब्रुवारी (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लीन चीट मिळाली आहे.
राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्या प्रकरणी राज्याच्या सहकार विभागाने चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे. या चौकशी समितीच्या अहवालात अजित पवार यांच्यासह तत्कालीन 65 संचालकांना क्लीनचीट देण्यात आल्याची माहिती उच्चपदस्त अधिकाऱ्यांकडून मिळाली. 

 यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, आनंदराव आडसूळ आदींचा समावेश आहे. राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांसह 65 संचालकांना मिळालेली ही दुसरी क्लीन चीट आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीने या गैरव्यवहाराचा तपास केला होता. त्या तपासातही अजित पवारांसह इतर संचालकांना क्लीन चीट मिळाली होती. ऑगस्ट 2019 मध्ये राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची एसआयटी नेमण्यात आली होती. एसआयटीने न्यायालयालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. 
 हिंदुस्थान समाचार 
Top