मनोरंजन

Blog single photo

अभिनेत्री करीना - सैफ यांना दुसऱ्यांदा पुत्ररत्न

21/02/2021

मुंबई, २१ फेब्रुवारी, (हिं.स.) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या घरी दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे. काल शनिवारी रात्री करीनाला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज रविवारी सकाळी 9 वाजता करीनाची प्रसुती झाली. करिनाला दुसरा मुलगा झाल्याची माहिती वडिल रणधीर कपूर यांनी दिली. बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
करीना आणि सैफ अली खानच्या बाळाची बातमी कळताच सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊनदरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. यापूर्वी सैफ अली खान आणि करीना कपूरला तैमूर हा एक मुलगा आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top