अंतरराष्ट्रीय

Blog single photo

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडून होळीच्या शुभेच्छा !

29/03/2021

वॉशिंग्टन, २९ मार्च, (हिं.स.) : अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
होळीच्या खूप शुभेच्छा ! होळी हा रंगांचा सण आहे. हा रंग आपल्या जवळच्या आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना लावला जातो. होळीचा सण हा सकारात्मक विचारांनी भरलेला असतो. या दिवशी आपण सर्वांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र यायला हवं, असे ट्विट करत कमला हॅरिस यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील भारतीयांना आणि ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय लोकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार


 
Top