राष्ट्रीय

Blog single photo

गडचिरोली : जहाल नक्षली गुड्डू राम कुडयामीस अटक

22/02/2021

गडचिरोली, २२ फेब्रुवारी (हिं.स.)  : जहाल नक्षलवादी गुडू
राम कुडयामी याला गडचिरोली पोलिसांनी अटक केलीय. विशेष अभियान पथक प्राणहिताचे
जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना सी-६० पथकाला मिळालेल्या गोपनिय
माहितीच्या आधारे सदर नक्षलवाद्यांस अटक करण्यात यश मिळाले आहे.जहाल नक्षली गुड्डू राम कुडयामी हा सन- २०१७
मुक्कावेली आरपीसी मिलीशिया प्लॉटुनमध्ये भरती झाला असुन
,
तो भरमार हत्यार सोबत बाळगत होता. त्याने सन- २०१७
मध्ये १५ दिवसाचे गरतुल येथे नक्षली प्रशिक्षण घेतले होते. उपपोस्टे जिमलगट्टा
हद्दीतील मौजा किष्टापूर नाल्यावर सन २०२० साली करण्यात आलेल्या वाहन जाळपोळीमध्ये
त्याचा प्रत्यक्ष सहभाग असून
, याबाबत उपपोस्टे जिमलगट्टा येथे भादंवि कलम ४३५, ४२७,३२४ तसेच भाहका कलम ०३/२५ नुसार गुन्हा दाखल असुन, त्यामध्ये तो फरार होता. तसेच
छत्तिसगड मधील मौजा सागमेटा येथील विज्या कुडयामी
,
मौजा दामाराम या गावातील गुज्या वड्डे मौजा मंडेम
गावातील बुधू तसेच मौजा लंकापार व येडसगुंजी येथील सहा.आरक्षक रमेश आंच्या हत्येत त्याचा
प्रत्यक्ष सहभाग होता. त्यासोबतच मौजा परसेगड येथे झालेल्या पोलीस- नक्षल
चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असून
, सदर नक्षलवाद्यांवर मौजा परसेगड पोलीस स्टेशन जि. बिजापूर येथे
गुन्हे दाखल आहेत. भादंवि कलम ३०२
,३०७ व भाहका कलम २५,२७, तसेच
भादंवि कलम ३०७
, १४७, १४८,
भाहका २५,२७ या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी फरार होता. या व्यतिरिक्त आणखी
किती गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे. याचा तपास गडचिरोली पोलीस दल करीत
आहे.उपपोस्टे जिमलगट्टा हद्दीतील मौजा किष्टापूर
नाल्यावर सन २०२० साली नक्षलवादयांकडुन करण्यात आलेल्या वाहन जाळपोळीमध्ये त्याचा
प्रत्यक्ष सहभाग असून
, याबाबत
उपपोस्टे जिमलगट्टा येथे दाखल गुन्हयात त्यास अटक करण्यात आले असुन
, मागील १५ दिवसांत गडचिरोली
पोलिसांनी एकूण ३ नक्षलींना अटक करण्यात आले आहे या कारवाईत शामिल जवानांचे पोलीस
अधीक्षक अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया
,
अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अभिनंदन केले
आहे.हिंदुस्थान समाचार


 
Top