मनोरंजन

Blog single photo

राणा दग्गुबाटी यांचा ' हाती मेरे साथी'

10/02/2020

हैदराबाद,  10  फेब्रुवारी 
(हिं.स.): अभिनेते राणा दग्गुबाटी यांच्या आगामी ' हाती मेरे साथीचित्रपटाची झलक प्रसिद्ध करण्यात आली आहे. हाती मेरे साथी  2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत. प्रभू सोलोमन
यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आले. चित्रपटाची निर्मिती इरोज नाउ या संस्थाने
केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट हिंदी
, तमिळ आणि तेलुगू भाषेत  प्रदर्शित होणार आहे आणि स्वतः
राणा दग्गुबाटी यांनी चित्रपटातील भूमिकेसाठी स्वतःचा आवाज दिला आहे.  चित्रपटात  श्रीया पिळगावकर यांनी देखिल काम केले आहेत.याशिवाय राणा  दग्गुबाटी "
विराट  पर्वम् " चित्रपटात देखील
झळकणार आहे. राणा दग्गुबाटी यांच्या
35 व्या वाढदिवसाचे निमित्त साधत ही घोषणा करण्यात आली. चित्रपटाची निर्मिती
राणा यांचे वडील सुरेश दग्गुबाटी आणि दिल राजू यांच्या संयुक्त विध्यमाने होणार
आहे. विराट  पर्वम्  हा चित्रपट आंध्रप्रदेशातील नक्सक्षवादी
चळवळीवर आधारित असल्याचे समजते. चित्रपटात राणा अभिनेत्री साई पल्लवी सोबत काम
करणार आहेत.एस एस राजामौली यांच्या बाहुबली सिनेमातून 
भल्लालदेवच्या  रूपात राणा घरोघरी
पोहचले आहेत. नुकतेच त्यांनी हाऊसफुल
4 मध्ये छोटीशी भूमिका बजाविली. तसेच एनटीआर बायोपिक मध्ये त्यांनी चंद्रबाबू
नायडू यांची भूमिका साकारली होती.हिंदुस्थान समाचार


 
Top