मनोरंजन

Blog single photo

लॉकडाऊन'च्या काळात फेसबुकच्या माध्यमातून घराघरात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहचतोय

30/04/2020

औरंगाबाद, 30 एप्रिल (हिं.स.) :छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीने लॉकडाऊनच्या काळात एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दररोज सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास घराघरात पोहचविण्याचे काम करत आहे.या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.


 छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती ही संघटना मागच्या ७ वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज शौर्यपीठ तुळापूरचा विकास व्हावा म्हणून झटत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास जगाला माहिती व्हावा म्हणून कसून काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वच घरी असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज महाराज सेवा समितीने फेसबुकच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे.

 फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहचावा म्हणून संशोधक अभ्यासक, कलाकार, युवा व्याख्याते, लेखक, कवी, कीर्तनकार यांना फेसबुकद्वारे छत्रपती संभाजी महाराजांचे विचार व इतिहास मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ सेवा समितीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. 

नामांकित शंभू व्याख्याते या फेसबुकच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील तमाम शंभूभक्तांशी वेगवेगळे मुद्दे घेवून चर्चा करत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास या महाराष्ट्रातील मातीतल्या लोकांना माहिती व्हावा म्हणून काम करत आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजता स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराणी येसूबाई यांची भूमिका निभवणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शंभू भक्तांशी संवाद साधला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी शंभूभक्तांना छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाशी कशा प्रकारे लढा दिला, तसाच घरी राहून कोरोना विरुद्ध लढा आपल्याला द्यायचा आहे. त्यामुळे आपण घरी राहून केंद्र आणि राज्य सरकारला साथ देऊ. 
डॉक्टर नर्स, पोलीस, महानगरपालिका प्रशासनाला मदत करू असे, आव्हान शंभू भक्तांना त्यांनी केले आहे. तसेच सेवा समितीचे आभार त्यांनी मानले आहे. त्यांनी येसूराणी यांची भूमिका निभावताना काय नेमक्या अडचणी आल्या त्या सांगितल्या. मला येसूबाई यांची भूमिका घेण्याची संधी मिळाली याचा खूप मोठा अभिमान वाटतो, असे त्यांनी मत व्यक्त केले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top