अपराध

Blog single photo

अकोला : इलेक्ट्रिशियननेच मारला दागिन्यांवर डल्ला; दोघे अटकेत

25/03/2021

अकोला, 25 मार्च(हिं.स.)कधी कधी चोरीच्या अशा काही घटना समोर आल्या आहेत की हे ऐकून पोलिसही हैराण झाले आहे. अकोल्यात एका घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याची तक्रार पोलीसांत दाखल झाली. शहरातील सिंधी कॅम्पमध्ये काल बुधवारी रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी खदान पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अवघ्या पाच तांसात या गुन्ह्याची उकल करत चोरटयाचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आलय. दरम्यान, तक्रारदार नरेश नारायन सचवाणी यांच्या घरात काल अचानक शॉट्स सर्किटमूळ बिघाड झाल्यानं घरातील लाइट गेली. अन् दुरस्तीकरिता इलेक्ट्रिशन बोलावण्यात आले. दरम्यान, यावेळी त्यांची नजर घरात ठेवलेल्या दागिनेवर पडली आणि त्यांचा मोह आवरला नाही. यानंतर अंधाराची संधी साधत त्यांनी घरातील दागिने लंपास केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून सतीष चावला आणि विजय चंदानी या दोघांनाही अटक केले. मात्र, यातील एका आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. दरम्यानं, खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार देवराव खंडेराव यांनी ही कारवाई केली आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top