अपराध

Blog single photo

औरंगाबाद : म्हैसमाळ येथे संशयखोर नव-याने केली पत्नीची हत्या

02/06/2020

औरंगाबाद, 02 जून (हिं.स.) :  बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत
नवऱ्याने बायकोवर कुऱ्हाड आणि चाकुने सपासप वार करून बायकोचा खुन केला आहे. खून करून आरोपी नवरा पसार झाला आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथे मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे खुलताबाद तालुक्यात एकच खळबळ उडाली. मृत महिलेचे नाव माया लहू साळवे आहे. 


म्हैसमाळ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकिय निवासस्थानात आपल्या आई- वडीला( सुभाष लहाणू तुपे रा. खुलताबाद ), सोबत मुलगी माया लहू साळवे व जावई लहू साळवे हे पती- पत्नी राहतात. हे पती पत्नी मुळचे साताळ ( चौका) ता. औरंगाबाद येथील राहीवाशी असून गेल्या काही महिन्यापासून ते म्हैसमाळ येथे सासरवाडीला राहत होते. गेल्या अनेक महिन्यापासून लहू साळवे हा पत्नी माया हिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करीत असे. अनेकवेळा हा वाद मायाच्या आई वडिलांना मिटविला होता. पंरतु आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास लहू साळवे याने पत्नी माया साळवे हिच्या मानेवर कुऱ्हाड व चाकुने वार करीत तिचा खून केला.  
या घटनेनंतर मृतक मायाच्या लहान मुलांनी  मायाचे वडील सुभाष लहानू तुपे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तुपे मायाच्या घरी गेले असता त्यांना मुलगी माया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तिला जखमी अवस्थेत खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी  मृत घोषित केले. पत्नीची हत्या केल्यानंतर  आरोपी लहू साळवे म्हैसमाळच्या डोंगराच्या जंगलात पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.  पुढील अधिक तपास पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे हे करत आहे. 

हिंदुस्थान समाचार 


 
Top