राष्ट्रीय

Blog single photo

नोटबंदीनंतर वायुसेनेने महत्त्वाची भूमिका निभावली होती- बी.एस. धनोआ

06/01/2020

मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.) : देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या विमुद्रीकरणानंतर एक हजार आणि पाचशे रुपयांचे नोट चलनातून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यावर मात करण्यात वायु सेनेने महत्त्वीच भूमिका बजावल्याची माहिती माजी एअर चिफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी सोमवारी दिली.

 
मुंबईतील टेकफेस्टमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
यावेळी धनोआ म्हणाले की, नोटबंदीनंतर नवे चलन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम वायुसेनेने केले होते. साधारणतः 20 किलोच्या एका बॅगमध्ये एक कोटी रुपये येतात, तर आम्ही किती कोटी रुपये पोहोचवले हे मी सांगूही शकत नाही. हवाईल दलाने सुमारे 625 टन नोटांचे दळणवळण केल्याची माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी त्यांनी राफेल खरेदीविषयी निर्माण झालेल्या वादावर प्रकाश टाकताना सांगितले की, अशा प्रकारच्या वादांमुळे संरक्षण व्यवहार धीम्या गतीने होतात आणि याचा परिणाम सैन्यावरही होतो. गेल्या वर्षी बालाकोट एअर स्ट्राईकनंतर झालेल्या चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांच्याकडे मिग 21 च्या ऐवजी राफेल विमान असते, तर परिणाम वेगळा दिसला असता असेही धनोआ यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top