मनोरंजन

Blog single photo

' मैदान ' चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित

28/01/2020

मंबई, 
28  जानेवारी (हिं.स)अभिनेते अजय देवगण त्यांच्या ' मैदान ' चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आले. चित्रपट 27 नोव्हेंबर 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा करीत असून
निर्मिती झी स्टुडिओ आणि बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणा सेनगुप्ता यांच्या
संयुक्त विद्यामाने करण्यात येणार आहे. चित्रपटात अभिनेत्री प्रियामणी राज यांची
वर्णी लागली आहे.गेलात तीस वर्षात शंभर पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करत विविध
प्रकाराच्या  भूमिका  साकारणारे अजय देवगण  वेगळ्या स्वरूपात सिने-रसिकांसमोर येणार आहेत.
1952 ते 1962 हा भारतीय फुटबॉल
संघाचा सुवर्णकाळ
'मैदान' या चित्रपटाद्वारे मांडण्यात येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण त्या काळातील
भारतीय संघाचे यशस्वी व्यवस्थापक सैय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत दिसणार
असल्याचे समजते.सैय्यद अब्दुल रहीम यांनी  भारतीय
फुटबॉल संघाची बांधणी करण्यात महत्वाचे योगदान दिले होते. त्यांच्याच मार्गदर्शनात
भारतीय संघाने
1956 साली मेलबर्न ऑलिम्पिक फुटबॉल उपांत्य फेरी पर्यंत मजल मारली होती. तसेच 1962 साली  जकार्ता  
येथे  झालेल्या  अशियन गेम्स मध्ये भारताने दक्षिण कोरियाला मात
देत इतिहास घडविला होता. 

तानाजी : दि अनसंग वॉरियर नंतर अजय देवगन दिग्दर्शक  एस एस राजामौली यांच्या  आरआरआर चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. हिंदुस्थान समाचार


 
Top