क्षेत्रीय

Blog single photo

अकोला: बाळापूर मतदारसंघात तिहेरी लढत

07/10/2019

अकोला, 7 ऑक्टोबर(हिं.स.) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे माजी आमदार गव्हाणकर आणि वंचितचे विद्यमान आमदार सिरस्कार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघात आता तिहेरी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. 


बाळापूर मतदारसंघ हा भाजपसाठी सोडण्यात येतो. तर हा काँग्रेसचा पारंपरिक गड मानल्या जातो. मात्र या निवडणुकीत पहिल्यांदाच हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. तर राष्ट्रवादीने हा मतदार संघ आपल्या पारड्यात पाडून घेतला आहे. सेनेकडून जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविकता या मतदार संघावर शिवसंग्राम ने आपली दावेदरी केली होती. शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर वंचित कडून धैर्यवर्धन पुंडकर याना उमेदवारी दिल्याने भारीपचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंड पुकारले होते. तर काँग्रेस चे प्रकाश तायडे यांनीही आपला उमेदवार अर्ज दाखल करून बंड केला होता. 
या मतदारसंघात राष्ट्रवादी कडून संग्राम गावंडे या युवा चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. अनेक बंडोबानी या मतदारसंघात आपली दावेदारी दाखवल्याने पक्ष उमेदवारांचे धाबे दणाणले होते. परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज विद्यमान आमदार सिरस्कार, भाजप माजी आमदार गव्हाणकर, शिवसंग्राम चे संदीप पाटील, संतोष हुशे तसेच प्रकाश तायडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदार संघात तिहेरी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. लढतीत राष्ट्रवादी संग्राम गावंडे, वंचितचा अभ्यासू चेहरा धैर्यवर्धन पुंडकर, शिवसेनेकडून नितीन देशमुख, यांच्या प्रामुख्याने ही लढत होणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात तर एमआयएम कडून डॉ. रहमान खान याना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांची सुद्धा उमेदवारी महत्वाचे मानली जात आहे. 
 हिंदुस्थान समाचार

 
Top