अंतरराष्ट्रीय

Blog single photo

चीनमध्ये करोनाचा हाहाकार; एकाच दिवशी ९७ जणांचा मृत्यू

10/02/2020

बीजिंग, १० फेब्रुवारी, (हिं.स.) : चीनमध्ये करोना व्हायरसचा कहर सुरूच असून मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल एकाच दिवशी तब्बल ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ९१ जणांचा मृत्यू वुहान प्रातांत झाला आहे. चीनमध्ये ४० हजारांहून अधिक जणांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला असून या व्हायरसमुळे आतापर्यंत ९०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

करोना व्हायरसच्या संसर्गामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष काळजी घेण्यात येत आहे. विमानतळावर प्रवाशांच्या स्क्रिनिंगची करण्यात येते. काल २१ विमानतळावर १८१८ उड्डाणांपैकी १, ९७ हजार १९२ प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात आली असल्याची माहिती भारताच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
हिंदुस्थान समाचार


 
Top