राष्ट्रीय

Blog single photo

सोनिया व राहुल गांधींसह प्रतिवादींना दिल्ली हायकोर्टाची नोटीस

22/02/2021

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी (हिं.स.) : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी खालच्या कोर्टाने दिलेल्या आदेशाला खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलेय. याप्रकरणी न्यायमूर्ती सुरेश कैत यांच्या खंडपीठात सोमवारी झालेल्या सुनावणीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुख्य साक्षींच्या आधारे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच इतरांवर खटला चालविण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता. आता न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी सोनिया गांदी, राहुल गांधी, एआयसीसी महासचिव ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि 'यंग इंडिया' (वायआय) यांच्या कडून 12 एप्रिलपर्यंत स्वामींच्या याचिकेवर उत्तर मागवले आहे. फसवणूक आणि अयोग्य मार्गाने पैसा मिळविण्याचे षड्यंत्र केल्याचा आरोप -
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या वतीने वकील सत्या सभरवाल आणि गांधी कुटुंब तथा इतरांकडून वकील तरन्नुम चीमा यांनी, उच्च न्यायालयाने नोटीस जारी केल्यासंदर्भात आणि 12 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित केल्यासंदर्भात दुजोरा दिला आहे. स्वामी यांनी खालच्या न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय इतरही काही लोकांवर फसवणूक आणि अयोग्य मार्गाने पैसा मिळविण्याचे षड्यंत्र केल्याचा आरोप केला आहे.
 हिंदुस्थान समाचार



 
Top