मनोरंजन

Blog single photo

बाहुबलीच्या सुनामीस तीन वर्ष पूर्ण

28/04/2020

हैदराबाद, 28 एप्रिल
(हिं.स) : 
भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणा-या दिग्दर्शक
एस. एस. राजामौली आणि  अभिनेते प्रभास
यांच्या
' बाहुबली : दि  कन्क्लुजन ' चित्रपटास मंगळवार 28 एप्रिल रोजी तीन वर्ष पूर्ण झाले.
आपले अभूतपूर्व निर्मितीने भाषा
, प्रांत, संस्कृती आणि देशाच्या सीमा ओलांडणा-या बाहुबली चित्रपटाने
भारतीय चित्रसृष्टीत नवनवे विक्रम स्थापन केले आणि संपूर्ण विश्वास मोहून टाकले.
चित्रपटाच्या त्रीवर्ष पूर्तीचे निमित्त साधात 
बाहुबलीच्या  चमूने ट्विटरवर  विशेष पोस्टर आणि संदेश प्रदर्शित केला.
"  बाहुबलीचे तीन वर्ष... ज्या
चित्रपटाने सर्व सीमा मोडून काढल्या ... जो चित्रपट आमचा जीवन होते.. जो
चित्रपट  कोटी कोटी भारतीय जनतेच्या
स्मरणात नेहमी राहील अशा बाहुबलीने तीन वर्षाचा प्रवास पूर्ण केला आहे.
बाहुबलीच्या सुनामीस तीन वर्ष पूर्ण 
"28 एप्रिल 2017 रोजी बाहुबली : दि कन्क्लुजन  ' तेलुगू, तामिळ, मल्याळम,   आणि हिंदी  भाषेत प्रदर्शित झाला. बाहुबली चित्रपटाने  प्रभास, राणा दग्गुबाटी, अनुष्का शेट्टी, रम्या कृष्णन , सत्यराज आणि 
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना अभूतपूर्व यश  प्रसिद्धी आणि नागरिकांचे प्रेम मिळाले.
अभिनेते  प्रभास आणि दिग्दर्शक  एस एस राजामौली यांनी या चित्रपटासाठी पाच वर्ष
सोबत काम केले होते. दोन भागांमध्ये प्रदर्शित झालेल्या बाहुबली चित्रपटाने भारतीय
चित्रपट सृष्टीस नव्या उंचीवर नेवून ठेवले सोबतच दोन हजार कोटींपेक्षा जास्त कमाई
देखील केली
. एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटानंतर सर्व
अभिनेत्यांच्या चाहत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एस. एस राजामौली यांचा  बाहुबली
चित्रपट प्रदर्शित होऊन
वर्ष लोटली तरीही जगभातील
लोकांमध्ये चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता आणि आकर्षण काही केल्या कमी झाले नाही. मागील
वर्षी लंडनच्या ऐतिहासिक रॉयल अल्बर्ट सभागृत 
एस. एस राजामौली यांच्या बाहुबली : दि बिगिनिंग या बाहुबली मालिकेतील  पहिल्या भागाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात
आले. या  प्रसंगी  बाहुबली प्रभास
, राणा दग्गुबाटी, अनुष्का शेट्टी, दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि निर्माते शोबु
यरलागड्डा तसेच  बाहुबलीची संपूर्ण चमू
उपस्थित होते .  या सोबतच चित्रपटाचे  दिग्दर्शक 
एस. एस राजामौली आणि संगीतकार एम. एम कीरवाणी प्रेक्षकांशी संवाद  साधला
 आणि एका विशेष ऑरकेस्ट्रात
चित्रपटातील गाण्यांचे सादरीकणार करण्यात आले.  दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या  बाहुबली 
चित्रपटानंतर सिने रसिक आता 
बाहुबली नेटफ्लिक्स वरील वेब सीरिजची वाट पाहत आहे. आनंद नीलकंठन यांच्या
"  दी  राईज 
ऑफ शिवगामी " या कादंबरीबर आधारित
' बाहुबली बिफोर दी  बिगिनींग 
' या वेब सीरिजचे  संगीत दिग्दर्शन करण्यासाठी  युवा संगीत दिग्दर्शक मिकी मेयर यांची निवड
करण्यात आली आहे.'बाहुबली बिफोर दी बिगिनींग  ' या नेटफ्लिक्स मालिकेचा आनंद लवकरच सिने
रसिकांना  घेता येईल.  एस. एस. राजामौली यांच्या  बाहुबली चित्रपटात शिवगामी चे पात्र अभिनेत्री
रम्या कृष्णन यांनी अजरामर करून टाकले. मात्र नेटफ्लिक्सच्या मालिकेत युवा  शिवगामीचे पात्र अभिनेत्री मृणाल ठाकूर
साकारणार आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन देव कट्टा आणि प्रवीण सत्तारू करणार असून
निर्मिती   बाहुबलीचे  शोबु यरलागड्डा यांची आर्का मीडिया वर्क्स
संस्था  करणार आहे. या मालिकेद्वारे शिवगामीचा
संघर्ष मांडण्यात येणार आहे.

बाहुबली
चित्रपटा
नंतर  दिग्दर्शक  एस
एस राजामौली
' आरआरआर' चित्रपट घेवून येत आहेतकोरोनाचे जागतिक संकट आणि देशव्यापी 
संचारबंदीचा सामना करीत असलेल्या नागरिकांना  उगादी आणि नवीन वर्षाचे निमित साधून बाहुबली
दिग्दर्शक  एस एस राजामौली यांनी मोठी भेट
आणि दिलासा दिला.  राजामौली यांच्या
आगामी 
' आरआरआर' चित्रपटाचे
शीर्षक आणि मोशन पोस्टर  प्रदर्शित करण्यात
आले.  पोस्टरमध्ये चित्रपटाचे नायक अभिनेते
राम चरण आणि ज्युनियर एनटीआर  यांना पाणी
आणि अग्नीच्या शक्तीच्या रूपात दाखविण्यात आले आहे.  

 मोशन पोस्टर बाबत ट्विटर द्वारे माहिती देताना   राजामौली म्हणाले, " जेव्हा पाणी आणि
अग्नी  सोबत येतात तेव्हा  अद्भुत शक्ती निर्माण होते ... "
' आरआरआर' चित्रपटाच्या
मोशन पोस्टरला सामाजिक माध्यमांवर जबरजस्त प्रतिसाद मिळतो आहे.
' आरआरआर' च्या तेलुगू , तामिळ, कन्नड , मल्याळम आणि
हिंदी भाषेतील शीर्षक देखील यावेळी जाहीर करण्यात आले. "राईज .. रोअर ..
रिवोल्ट ... " अशी चित्रपटाची संकल्पना आहे.


बाहुबली दिग्दर्शक  एस एस राजामौली यांच्या ' आरआरआर' चित्रपटासाठी चित्रपट
प्रेमींना  थोडी वाट पाहावी लागणार आहे.
' आरआरआर ' शुक्रवार  8 जानेवारी 
2021 ला प्रदर्शित होणार आहे. आरआरआर ' अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या महान
क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित घटनांवर एक काल्पनिक चित्रपट आहे
. चित्रपटात अभिनेते अजय देवगण आणि आलिया भट यांचा देखील
समावेश आहे
.  चित्रपटात अभिनेते  ज्युनियर एनटीआर कोमाराम भीम  यांची
भूमिका साकारणार आहेत तर
   राम
चरण अल्लुरी सीताराम राजूंच्या भूमिकेत दिसणार आहेत
.

ज्युनियर एनटीआर आणि राम चरण पहिल्यांदाच एकत्र आले असून बाहुबलीनंतर  दिग्दर्शक  एस एस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. बाहुबलीच्या यशानंतर आरआरआर दहा
भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटात  आंतर-राष्ट्रीय स्तराचे
कलाकार
  सहभागी
झाले आहेत. अभिनेत्री ओलिव्हिया मॉरिस
,  अ‍ॅलिसन
डूडी आणि रे स्टीव्हनसन राजामौली यांच्यासोबत काम करणार आहेत.हिंदुस्थान समाचार


 
Top