क्षेत्रीय

Blog single photo

अमरावतीत कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात १२ नवे रुग्ण

01/06/2020

अमरावती, ०१ जून (हिं.स.) : अमरावती शहरात कोरोनाचा कहर बरसने सुरूच असून आज दिवसभरात पुन्हा १२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक रुग्ण अचलपूर तालुक्यातील काकडा येथील आहे तर उर्वरित ११ रुग्ण हे अमरावती शहराच्या विविध भागातील आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३० इतकी झाली असून अमरावतीकरांसाठी ही चिंतेची बाब आहे. 


शहरात आज, सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुधवारा ४, मसानगंज ३,चेतनदास बगीचा २, तर दसरा मैदान आणि शिक्षक कॉलोनी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काकडा येथील १ रुग्ण असे एकूण १२ रुग्ण आज दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले आहेत. ज्यामध्ये ९ पुरुष, २ महिला आणि एका बालकाचा समावेश आहे.या सर्व रुग्णांना अमरावतीच्या कोविड १९ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे काम सुरु आहे. 

हिंदुस्थान समाचार


 
Top