ट्रेंडिंग

Blog single photo

सातारा डेपोमधील 6 शिवशाही बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी

10/02/2021

सातारा, 10 फेब्रुवारी (हिं.स.) : सातारा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या डेपोमध्ये पार्क केलेल्या 6 शिवशाही बसेस आज, बुधवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यात. एका तरुणाने पार्क असलेल्या बसला आग लावली. ही आग पसरली आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर 5 बसेनही पेट घेतला. दरम्यान बसला आग लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. परंतु त्याने आग का लावली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

यासंदर्भातील माहितीनुसार डेपोमध्ये पार्क असलेल्या सहा बसेस पूर्णपणे भस्मसात झाल्यात.अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. पोलीस दलही घटनास्थाळी पोहोचले आहे. या आगीत शिवशाही बस जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली .
 हिंदुस्थान समाचार 
Top