खेल

Blog single photo

नाशिकचा कुणाल कोठावदे महाराष्ट्र संघात

28/10/2019

नाशिक, 28 ऑक्टोबर (हिं.स):- नाशिकचा मधल्या फळीतील फलंदाज कुणाल कोठावदे याची महाराष्ट्रातर्फे 23 वर्षाखालील संघासाठी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय तर्फे आयोजित एक दिवसीय मर्यादित षटकांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे 23 वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व कुणाल करणार आहे सदर स्पर्धेचे सामने 31 ऑक्टोबर पासून 13 नोव्हेंबर पर्यंत मैसूर येथे होणार आहेत.

महाराष्ट्राचे सामने बडोदा, कर्नाटक, तामिळनाडू, विदर्भ , पंजाब ,जम्मू आणि काश्मिर व गुजरात या संघाशी होणार आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघातर्फे तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या कुणाल ने मागील वर्षी देखील बीसीसीआय च्या २३ वर्षाखालील स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो मंद गती ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करतो.

सदर निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व पदाधिकारी यांनी कुणाल चे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

हिंदुस्थान समाचार


 
Top