अंतरराष्ट्रीय

Blog single photo

कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, 35 ठार, 48 जखमी

07/01/2020

केरमान , 07 जानेवारी (हिं.स.) : इराणी सैन्याचे कंमांडर कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत 35 जण ठार झाले असून 48 जण जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात शुक्रवारी जनरल कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला होता. इराणच्या केरमान शहरात मंगळवारी कासिम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडल्याची माहिती पुढे आलीय. 

गेल्या 3 जानेवारी रोजी बगदाद विमानतळानजीक अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. कमांडर सुलेमानी इराणमध्ये अतिशय लोकप्रिय असल्यामुळे सोमवारी त्यांचे पार्थिव इराणची राजधानी तेहरान येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात असता सुमारे 10 लाख लोक जमले होते. अतिशय लोकप्रिय असलेल्या कासिम सुलेमानीचा दफनविधी मंगळवारी केरमान येथे करण्यात आला. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत लाखो नागरिक सहभागी झाले होते. प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या 35 जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे 48 जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. 
हिंदुस्थान समाचार 
Top