अंतरराष्ट्रीय

Blog single photo

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून 14 जणांचा मृत्यू

27/12/2019

अल्माटी, 27 डिसेंबर (हिं.स.) : कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. टेक ऑफ दरम्यान वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला आणि विमान नजिकच्या दोन मजली इमारतीवर जाऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आपात्कालिन सेवा विमानतळावर दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. 

 यासंदर्भातील माहितीनुसार अपघातग्रस्त विमान 5 क्रू मेंबर्स आणि 95 प्रवाशांना सोबत घेऊन स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 22 मिनीटांनी अल्माटीवरून नूर सुल्तान या ठिकाणी निघाले होते. परंतु, अल्माटी विमानतळावर टेक ऑफ घेताना जवळ असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळले, यापैकी काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top