अपराध

Blog single photo

नागपुरात महावितरणच्या मुख्य अभियंत्याची आत्महत्या

13/03/2020

नागपूर, 13 मार्च (हिं.स.) : महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी शुक्रवारी दुपारी मालगाडीखाली आत्महत्या केली. नागपूर रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला. 

 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शासकीय वाहनाने घुगल रेल्वे स्थानकावर आले. चालकाला त्यांनी माझा मित्र येणार आहे, थोड्या वेळात येतो. तू पार्किंगमध्ये थांब असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर मुंबईच्या बाजूने असलेलया रल्वे मार्गावर ते चालत गेले आणि पार्सल ऑफिसच्या थोडे पुढे त्यांनी चालत्या मालगाडीच्या चाखाखाली उडी घेतली. याबाबत कळताच लोहमार्ग पोलिस तसेच आरपीएफने घटनास्थळी धाव घेतली.
 पोलिसांना त्यांच्या खिशात पैसे, ओळखपत्र, मोबाइल आदी साहित्य सापडले. त्या आधारेच लोहमार्ग पोलिसांनी महावितरणच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला व या घटनेबाबत कळविले. दरम्यान पार्किंगमध्ये त्यांच्या चालकाला याबाबत काहीच कल्पना नव्हती. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या चालकाशी संपर्क साधला असता आपण रेल्वे स्थानकावर साहेबांची वाट पाहात असल्याचे सांगितले. त्यानंतरच पोलिसांना बाहेर चालक उभा असल्याची माहिती मिळाली. घुगल हे काटोल मार्गावरील महावितरणच्या कॉलनीत वास्तव्याला होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. 
 हिंदुस्थान समाचार
 
Top