खेल

Blog single photo

कोरोनानंतर पुढील उपचारासाठी सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

02/04/2021

02/04/2021मुंबई, २ एप्रिल (हिं.स.) : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात आपण रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती त्याने स्वतः ट्विट करून दिली आहे.

कोरोनाची लागण झाल्यावर सचिन घरातच क्वारंटाईन होता. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. दरम्यान सचिनला कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या तसंच त्याची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशा मनोकामना व्यक्त केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सचिनने ट्विटच्या माध्यमातून चाहत्यांचे आभारही मानले आहेत. ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी आभारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे. मला आशा आहे की पुढील काहीच मी घरी परतेन. तुम्हीही तुमची काळजी घ्या, सुरक्षित रहा…”


हिंदुस्थान समाचार


 
Top