महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, 43 हजार 183 नवे रुग्ण, 249 जणांचा मृत्यू
01/04/2021
मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला असून राज्यात गुरुवारी दिवसभरात 43 हजार 183 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 249 जणांचा मृत्यू झालाय.
राज्यातील मृत्यू दर 1.92 टक्के आहे. तर, राज्यात आजघडीला कोरोनाचे एकूण 3 लाख 66 हजार 533 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज 32 हजार 641 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 24 लाख, 33 हजार, 368 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 85.2 टक्के आहे.
हिंदुस्थान समाचार