अंतरराष्ट्रीय

Blog single photo

कोरोना इफेक्ट : न्यूझीलंड सरकारने भारतातून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली

08/04/2021
नवी दिल्ली, ८ एप्रिल, (हिं.स) : कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता न्यूझीलंड सरकारने भारतामधून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली आहे.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.


 ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. यात  न्यूझीलंडच्या नागरिक असणाऱ्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे.

 भारतातून न्यूझीलंडमध्ये गेलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता धोका पाहता हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे आर्डेन यांनी सांगितले.

 हिंदुस्थान समाचार


 
Top