खेल

Blog single photo

क्रिकेटच्या देवाचा लाॅरियस पुरस्काराने जागतिक सन्मान

18/02/2020

बर्लिन, १८ फेब्रुवारी (हिं.स.) - क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने मैदानावर तर विक्रम घडवलेच. पण आता निवृत्तीनंतरही त्याचा जागतिक सन्मान झाला आहे. गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट क्रीडा क्षणाचा म्हणजे

लॉरियस

पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा

त्याच्यासह देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. बर्लिनमध्ये सोमवारी

(१७ फेब्रुवारी)

रात्री

लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला.
भारतीय क्रिकेट संघाने

२ एप्रिल २०११ रोजी

वानखेडे मैदानावर श्रीलंकेचा पराभव करून आयसीसी

विश्वचषक

स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. या विजेतेपदानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती.

गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट क्रीडा क्षणाचा म्हणजे

लॉरियस

पुरस्कार

मिळाला आहे. क्रिकेट मैदानात अनेक पुरस्कार आणि चषक उंचावणाऱ्या सचिनने निवृत्तीनंतर साडेपाच वर्षांनी आणखी एक मोठा सन्मान मिळवला आहे.

सचिनला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या क्षणाला 'कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन' असे शीर्षक देण्यात आले होते. नऊ वर्षांपूर्वी सचिनने त्याच्या सहाव्या विश्वचषक स्पर्धेत प्रथमच चषक उंचावला होता. भारताने

विश्वचषक

जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर घेत 'लॅप ऑफ ऑनर' दिला होता. अनेक वर्षे देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सचिनला तेव्हा अश्रू रोखता आले नव्हते. लॉरेन्स अकादमीचा सदस्य आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने सचिन तेंडुलकर संदर्भातील या क्षणाला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले होते.


हिंदुस्थान समाचार


 
Top