मनोरंजन

Blog single photo

दिया मिर्झा आणि वैभव रेखीचा विवाह थाटात संपन्न

15/02/2021

मुंबई, 15 फेब्रुवारी (हिं.स.) : सुप्रसिद्ध अभिनेत्री दीया मिर्झा सोमवारी वैभव रेखीसोबत विवाह बंधनात अडकली. दिया मिर्झाच्या पाली हिल येथील बेल-एअर या इमारतीत हा लग्नसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याला दीया आणि वैभवच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत झाले. 

यासोबतच लग्नाला अदिती राव हैदरी, लारा दत्ता आणि जॅकी भगनानी यांनी हजेरी लावली होती. दीया मिर्झाप्रमाणेच बिझनेसमन वैभव रेखीदेखील विवाहित आहे. तो देखील पहिल्या पत्नीसोबत काही वर्षांनी विभक्त झाला आहे. वैभव रेखीचे पहिले लग्न योगा इंस्ट्रक्टर सुनयना रेखी सोबत झाले होते आणि त्यांना एक मुलगी आहे. तीदेखील या लग्नाला आली होती. दीया मिर्झा आणि वैभव रेखी मागील वर्षी कोरोनामुळे जाहिर केलेल्या लॉकडाउनमध्ये त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यानंतर ते दोघे वांद्रेमधील घरी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. 
हिंदुस्थान समाचार


 
Top