राष्ट्रीय

Blog single photo

भारत-बांगलादेशात 7 करारांवर स्वाक्षऱ्या

05/10/2019

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर (हिं.स.) भारत-बांगलादेश यांच्यातील संबंधांना नवे आयाम देणारी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजिद यांच्या भेटीदरम्यान भारत आणि बांगलादेश यांच्या एकूम 7 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या गुरूवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत.


 यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला आज खरोखरच आनंद होत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 आणि द्विपक्षीय योजनाचे उद्धाटन करण्याची संधी मला मिळाली. आजच्या तिन्ही योजना वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. एलपीजी इंपोर्ट, व्होकेशनल ट्रेनिंग आणि सोशल फॅशिलिटी. तिन्ही योजनांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आपल्या नागरिकांचे जीवनमान उंचावणे. बांगलादेशहून एलपीजी आयात, बांगलादेश-इंडिया प्रफेशनल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि ढाकात रामकृष्ण मिशनमध्ये विवेकानंद भवन हे होय.
त्यासोबतच बांगलादेश-इंडिया प्रफेशनल स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट बांगलादेशच्या औद्योगिक विकासासाठी कुशल मनुष्यबळ, आणि टेक्निशियन तयार करणे हे होय.
 ढाका येथील रामकृष्ण मिशनमध्ये विवेकानंद भवनचे प्रोजेक्ट, जे दोन महानुभावांच्या जीवनांवर प्रेरणा देतील. आपला समाज आणि मूल्यांवर आधारित स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचा खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे. बांग्लादेश सांस्कृतिकची उदारता आणि खुली भावना यांच्याप्रमाणे या मिशनमध्ये सर्व पंथांना मानणाऱ्यांना स्थान असणार आहे. विवेकानंद भवनमध्ये 100 हून अधिक विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधन स्कॉर्लसला राहण्याची संधी मिळणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top