राष्ट्रीय

Blog single photo

सावरकर अवमाना प्रकरणी न्यायालयात जाणार - सात्यकी सावरकर

07/01/2020

 पुणे, 07 जानेवारी (हिं.स) ब्रिटिश आणि स्वकीयांसोबत एकाच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लढा दिला. अंदमानमध्ये दोन वेळा काळ्यापाण्याची शिक्षा मिळणार असे समजल्यानंतर देखील सावरकर डगमगले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. मात्र, त्यांच्याविषयी अवमानकारक व हीन दर्जाचे लेखन केले जात आहे हे दुर्दैवी असून, त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यात सांगितले.

मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन दर्जाचे लेखन केले आहे. याचा निषेध करण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने स्वातंत्र्यशाहीर सावरकर व अन्य शाहिरांच्या पोवाडे गायनातून सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रभक्तीचा शाहिरी जागर करण्यात आला. 

या वेळी स्वा. सावरकरांविषयीचे अभ्यासक अक्षय जोग, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शुभांगी आफळे, मोहन शेटे, अरुणकुमार बाभूळगावकर, महादेव जाधव, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते.सावरकर म्हणाले, भारतातील प्रत्येक क्षेत्रातील नामवंतांनी सावरकरांविषयी गौरवोद्गार काढले. त्यामुळे सगळ्यांनी या अवमानाचा निषेध करायला हवा. मी देखील न्यायालयाच्या माध्यमातून याविरोधात लढा देणार आहे. सामान्यांनी देखील आपापल्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी याचा निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केले. 

हिंदुस्थान समाचार


 
Top