राष्ट्रीय

Blog single photo

टीआरपी घोटाळा : पार्थो दासगुप्ताला जामीन मंजूर

02/03/2021

मुंबई, 02 मार्च (हिं.स.) : टीआरपी घोटाळ्यातील मुख्य आरोपी पार्थो दासगुप्ता याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाने पार्थोदास गुप्ता याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली आहे. पार्थोदास गुप्ता सुमारे २ महिन्यांपासून  जेलमध्ये होता. 

 गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात टीआरपी घोटाळा उघडकीस आला. या गुन्ह्यात अनेक जण आरोपी आहेत. या गुन्ह्यात सुरुवातीला बार्कचे अधिकारी तक्रारदार होते. त्यानंतर त्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांना ही अटक होऊ लागली. अशाच प्रकारे बार्कचे सर्वेसर्वा पार्थोदास गुप्ता याला 24 डिसेंबर 2020 रोजी अटक झाली होती. या गुन्ह्यात महत्त्वाचा रोल असल्याने त्याला अटक झाली होती. पार्थो दासगुप्ता टीआरपी (टेलीविजन रेटिंग प्वाईंट्स) प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. पार्थो दासगुप्ता 2013 ते 2019 या काळात बार्कचा सीईओ होता. एका ठराविक चॅनेलच्या टीआरपी वाढवण्यासाठी पार्थोने त्या चॅनेलकडून वेगवेगळ्या प्रकारे फायदा उठवला होता. त्याच्याकडून पैसे ही घेतले होते. यामुळे पार्थोला अटक झाली होती.पार्थो याने सुरुवातीला मुंबई सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सेशन कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर गेल्या शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी आज,मंगळवारी कोर्टाच्या न्या. प्रकाश नाईक यांनी हा निकाल दिला. यावेळी पार्थोचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 टीआरपी घोटाळ्यात आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने दोनदा आरोपपत्र दाखल केले आहे. एकदा मूळ आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र दाखल केल आहे. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते.याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली होती. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचा भंडाफोड झाला होता. 
 आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी
 विशाल वेद भंडारी, 2) बोंम्पेल्लीराव नारायण मिस्त्री, 3) शिरीष सतीश पट्टण शेट्टी, 4) नारायण नंदकिशोर शर्मा, 5) विनय राजेंद्र त्रिपाठी, 6) उमेश चंद्रकांत मिश्रा, 7) रामजी दुधनाथ शर्मा, 8) दिनेश पन्नालाल विषवकर्मा, 9) हरीश कमलाकर पाटील, 10) अभिषेक कोलवडे
11) आशिष अबीदूर चौधरी, 12) घनश्याम सिंग, 13) विकास खांचंदाणी, 14) रोमिल
15) पार्थो दासगुप्ता 
हिंदुस्थान समाचार


 
Top