क्षेत्रीय

Blog single photo

करोना : गावकऱ्यांनी गावच केले बंद

24/03/2020

अकोला ,24 मार्च (हिं.स.) : अकोला येथून जवळ असलेल्या रिधोरा गावातील गावकऱ्यांनी कोरोनाच्या धास्तीमुळे गावाच्या प्रवेश द्वारावरच प्रवेश बंदीचे बोर्ड लावून गावात येणाऱ्या नागरिकाना प्रवेशास मज्जाव केलाय.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर रिधोरा नावाचे 5 ते 6 हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. सध्या देशासह राज्यात कोरोना या जीवघेण्या व्हायरस ने थैमान घातले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात या व्हायरसची धास्ती वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी रिधोरा या गावात आत येण्यासाठी असलेल्या प्रवेश द्वारावर टेबल खुर्च्या आदी लावून ब्लॅक बोर्डवर परदेशातून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश नाकारलाय. राज्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेगणिक वाढतच असून कोरोनाला रोखण्यासाठी गावातील नागरिक विविध प्रकारे युक्त्या लढवतांना दिसत आहेत. 
 हिंदुस्थान समाचार


 
Top