अपराध

Blog single photo

अकोला: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, चिमुकला ठार

12/03/2020

अकोला, 12 मार्च (हिं.स.) राष्ट्रीय महामार्गावर वणीरंभापुर जवळ भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना आज घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले,तर एक आठ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सम्राट वानखडे असे मृत बालकाचे नाव आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, कोठारी येथील निशांत गवई हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.30 बी.जी.3006 वरून बहीण सुजाता पवन वानखडे, मुलगा सम्राट पवन वानखडे (वय आठ वर्ष) हे तिघे कोठारी येथुन बोरगाव मंजू येथे येत असताना बोरगाव मंजू कडुन भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकर ट्रक क्रमांक एम.एच.48 ए.वाय,0396 या वाहनाने दुचाकीला धडक दिली. 
या अपघातात निशांत गवई, सुजाता वानखडे,सम्राट वानखडे हे गंभीर जखमी झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू ठाणेदार हरिश गवळी सह पोलीसांनी
घटना स्थळावर धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला, दरम्यान गंभीर जखमी झालेल्या निशांत गवई, सुजाता वानखडे,सम्राट वानखडे उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता सम्राट वय आठ वर्ष यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी फिर्याद दिली वरून बोरगाव मंजू पोलिस सदर ट्रक चालका विरुद्ध विविध कलमन्वे गुन्हा दाखल करुन सदर ट्रक सह चालकास ताब्यात घेऊन पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत. 
 हिंदुस्थान समाचार
 
Top