नवी दिल्ली, 06 एप्रिल (हिं.स.) : न्यायमूर्ती एन.व्ही. रमना यांची देशाचे नवे सरन्यायमूर्ती म्हणून निवड करण्यात आली आहे. यासंबंधी राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यालयातून नोटीस जारी करण्यात आली आहे. आगामी 24 एप्रिल रोजी न्या. एन.व्ही. रमन्ना आपल्या पदाची शपथ घेतील. ते देशाचे 48 वे सरन्यायमूर्ती असणार आहेत.