राष्ट्रीय

Blog single photo

नाशिकच्या आडगावचा जवान श्रीनगरजवळ शहीद

08/01/2020

नाशिक, ०८ जानेवारी (हिं.स):  जम्मू काश्मिरमध्ये श्रीनगरच्या पुढे सुमारे ७०
कि. मी. अंतरावर तैनात असलेला आडगांव ता. जि. नाशिक येथील लष्करी जवान आप्पा मधुकर
मते (३६) यांचा आक्सीजन कमी पडल्याने मृत्यु झाला. या घटनेमुळे आडगांव येथे शोककळा
पसरली असुन याचे पार्थिव उद्या नाशिकला येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. श्रीनगरच्या पुढे ७० कि. मी. अंतरावर असलेल्या
उंच भागातील एका चौकीवर कार्यरत असतांना ऑक्सीजन कमी पडल्याने आप्पा मते यांना
हद्ययविकाराचा इटका आल्याने मंगळवारी (७ जानेवारी) राजी रात्री त्यांचा मृत्यु झाला.
या घटनेची माहिती आज सकाळी त्यांच्या आडगांव येथील कुटुंबिय व नातेवाईकांना
देण्यात आली. यानंतर या गावावर शोककळा पसरली असुन त्यांच्या नातेवाईक व
मित्रपरिवाराचे मते यांच्या घरी धाव घेतली आहे. त्यांच्या मृत्युनंतर लष्कर व
स्थानिक पोलीसांची कायदेशिर प्रक्रिया आज पुर्ण झाल्यानंतर रात्री किंवा उद्या
त्यांचे पार्थिक नाशिकला आणले जाणार असल्याची माहिती लष्कराकडुन देण्यात आली आहे.
आप्पा मते हे अल्पभूधारक शेतकरीत असुन आई - वडील यांनी मोठ्या कष्टाने त्यांचे
शिक्षण केले होते. सन २००६ मध्ये ते सैन्यात भरती झाल्यानंतर मागील वर्षात त्यांचा
कालवधी संपल्यानंतर त्यांनी पुढे चार वर्षाचा कालवधी वाढवून घेतला होता. मागील
वर्षात सेवानिवृत्त न होता
, त्यांनी देशप्रेमातून बॉण्ड
वाढवून घेतला. त्यांच्या पश्चात आई म्हाळसाबाई मते
, पत्नी मनीषा,  मुलगा प्रतिक, भाऊ भगिरथ असा परिवार आहे.हिंदुस्थान
समाचार


 
Top