राष्ट्रीय

Blog single photo

अनिल देशमुख कायद्याने चालतात की राजकीय वायद्याने.. ?

09/01/2020

- माजी मंत्री एड्. आशिष शेलारांचा घणाघात 


 मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.) : एकीकडे मुंबईत “आझाद काश्मीर” चे फलक झळकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणा-या पोलिसांवर राजकीय दबाबव टाकला जात असल्याची चर्चा रंगली असताना माजी मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गृहमंत्री कायद्याने चालतात की राजकीय वायद्याने ? असा सवाल ऍड. शेलार यांनी उपस्थित केलाय. 

माजी शिक्षण मंत्री आमदार  आशिष शेलार यांनी “आझाद काश्मीर” चे आंदोलन हे महाराष्ट्र शासन पुरस्कृत असल्याचा आरोप बुधवारी केला होता. याबाबत बोलताना माझ्या या म्हणण्याला आता बळ मिळत असून एक एक घटना पुढे येवू लागल्या आहेत. असे सांगत त्यांनी आज पुन्हा एकदा सरकारी पक्षांच्या भूमिंकावर ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे. 

ऍड. शेलार यांच्या ट्वीटमध्ये नमूद केल्यानुसार “आझाद काश्मीर” चा फलक झळकावणे, या प्रकारची अजून पोलीस चौकशी सुरु आहे, ती पूर्ण झाली नाही तरी राज्याचे गृहमंत्री म्हणतात आम्ही “फेरचौकशी” करू. तर न्या. लोया केस सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्यावर पुन्हा “रि-ओपन” करू असे ते म्हणत आहेत. या राज्याचे गृहमंत्री कायद्याने चालतात की राजकीय वायद्याने असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबईतील आंदोलनादरम्यान “आझाद काश्मीर” चा फलक हा प्रत्यक्ष पुरावा असताना आणि या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु असताना त्या पुराव्यावर भाष्य करणे, त्याचा अर्थ लावणे, अथवा तत्सम कोणतीही बाब करणे म्हणजेच त्या पुराव्याशी छेडछाड केल्यासारखे आहे. या प्रकरणी राज्यातील सत्ता पक्षातील दोन मोठे नेते या फलकावर भाष्यकरून अशा प्रकारची छेडछाड तर करीत नाहीत ना? असा सवाल उपस्थित करीत आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणात सरकारी पक्ष पोलिसांवर राजकीय दबाव आणतो आहे. असा थेट आरोप त्यांनी केला आहे. तसेच हे आंदोलन महाराष्ट्र शासन पुरस्कृत आहे हे माझे म्हणणे अश्याप्रकारे सिद्ध होते असेही त्यांनी म्हंटले आहे.
हिंदुस्थान समाचार 
Top