राष्ट्रीय

Blog single photo

जगत प्रकाश नड्डा यांच्या भेटीला जनसेना नेते पवन कल्याण

13/01/2020

नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) : जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते पवन कल्याण यांनी सोमवारी भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची नवी दिल्लीत यांच्या निवास स्थानी भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी एल संतोष, खासदार तेजस्वी सूर्या, आणि जनसेना पक्षाचे जेष्ठ नेते नाडेण्ड्ला मनोहर उपस्थित होते. 

पवन कल्याण यांनी जगत प्रकाश नड्डा यांचे गणपतीची मूर्ती देऊन स्वागत केले तसेच राष्ट्रीय तसेच आंध्र प्रदेशातील राजकीय, सामाजिक तसेच अन्य महत्वाचा मुद्यांवर चर्चा केल्याचे समजते. या भेटीमुळे पवन कल्याण पुन्हा एकदा भाजप सोबत जवळीक साधत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे युवा खासदार प्रताप सिम्हा आणि तेजस्वी सूर्या यांनी हैदराबाद येथे अभिनेते आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांची भेट घेतली होती. 

 पवन कल्याण प्रथितयश तेलुगू अभिनेते असून जनसेना पक्षाचे प्रमुख आहेत तसेच माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस नेते आणि अभिनेते मेगास्टार चिरंजीवी यांचे लहान भाऊ आहेत. चिरंजीवी यांच्या ' प्रजा राज्यम ' पक्षताही पवन कल्याण यांनी महत्वाची भूमिका बजाविली होती.

2014 लोकसभा निवडणुकीच्या आधी कल्याण यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद मोदी यांची गांधीनगर येथे जाऊन भेट घेतली होती. तसेच प्रचारादरमान्य नरेंद मोदी यांनी देखील कल्याण यांचे भर सभेत कौतुक केले होते. 

2014 साली लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभेत जनसेना पक्षाने भाजपा-टीडीपी युतीला पाठिंबा घोषित केला होता परंतु केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने त्यांनी युतीचा पाठिंबा काढला होता.

2019 च्या निवडणूक स्वबळावर लढविल्या मात्र विधान सभेत जनसेन पक्षाला फक्त एक जागा मिळाली तर लोकसभेत एकही जागा जिंकता आली नाही. खुद्द पवन कल्याण यांना गजुवाक आणि भीमावरम् विधानसभा मतदार संघातून प्रभाव पत्करावा लागला.

 हिंदुस्थान समाचार


 
Top