राष्ट्रीय

Blog single photo

दाऊदचा साथीदार एजाज लकडावाला याला अटक; २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

09/01/2020

मुंबई, ०९ जानेवारी, (हिं.स.) : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी एजाज लकडावाला याला बिहारच्या पाटणा येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी त्याला पाटणा विमानतळावरून अटक केली. त्याची २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एजाज लकडावालाविरोधात हत्या आणि खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात मुंबईत सुमारे २५ गुन्ह्यांची नोंद आहे. तर, दिल्लीत देखील अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
एजाजची मुलगी सानिया हिला बनावट पासपोर्टप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. सानियाच्या चौकशीतून एजाजचे नावे समोर आले. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून एजजाला अटक केली.
हिंदुस्थान समाचार


 
Top