राष्ट्रीय

Blog single photo

आमच्या परिवारासाठी महत्वाचा दिवस : डॉ मल्लिका नड्डा

20/01/2020

नवी दिल्ली, 20 जानेवारी (हिं.स.) :माजी केंद्रीय मंत्री, राज्य सभा सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना मिळणाऱ्या नवीन जबाबदारीवर नड्डा यांच्या पत्नी डॉ मल्लिका नड्डा यांनी आनंद व्यक्त केला आहे. नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना मल्लिका म्हणाल्या, " हा दिवस आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी तसेच बिलासपूर तसेच हिमाचल प्रदेशच्या लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. एका लहान राज्यातील व्यक्तीला इतकी मोठी जबाबदारी मिळत आहे. " 

भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आता राष्ट्रीय अध्यक्ष होणार याबाबत जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत संरक्षण मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी यावर सूचक वक्तव्य केले, माध्यमांशी बोलताना सिंह म्हणाले की, जगत प्रकाश नड्डा नक्कीच राष्ट्रीय अध्यक्ष होतील असा माझा विश्वास आहे. 

भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी, निवडणूक प्रमुख राधा मोहन सिंह तसेच कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा देखील उपस्थित आहेत. 

2019 निवडणुकीत ज्वलंत विजय मिळवल्यानंतर अमित शाह केंद्रीय गृह मंत्री झाले. त्यानंतर जून महिन्यात जगत प्रकाश नड्डा यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते.मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जे. पी नड्डा यांनी आरोग्य मंत्री म्ह्णून काम पहिले.  आयुष्मान भारत योजना, मिशन इंद्रधनुष ह्या योजना त्यांच्याच कारकिर्दीत सुरु करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत जे.पी नड्डा यांच्याकडे उत्तर प्रदेश राज्याची जबाबदारी होती. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top