राष्ट्रीय

Blog single photo

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते पार पडला ' हलवा कार्यक्रम '

20/01/2020

नवी दिल्ली, 20 जानेवारी (हिं.स.) : मोदी सरकारच्या आगामी 2020-21च्या अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. 1 फेबृवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. मात्र प्रत्येक अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या आधी एका विशेष कार्यक्रमाचे आकर्षण असते ते म्हणजे अर्थ मंत्रालयातील ' हलवा कार्यक्रम.'

अर्थसंकल्पाच्या पार्शवभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत सोमवारी बहुप्रतिक्षित ' हलवा कार्यक्रम ' अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक स्थित कार्यालयात पार पडला. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, वित्त सचिव तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी निर्मला सीतारामन यांनी मंत्रालयातील कर्मचारी वर्गाला शिरा वाटप करीत हलवा कार्यक्रमाचे विधिवत उदघाटन केले. 

हलवा कार्यक्रमाद्वारे केंद्रीय अर्थसंकल्पच्या मुद्रणाचे काम सुरु होते. यावेळी विशेष गुप्तता बाळगली जाते आणि सभागृहात अर्थसंकल्प सादर होई पर्यंत अर्थ मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कार्यलयातच थांबावे लागते. आगामी 2020-21च्या अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून सूचना तसेच अभिनव कल्पना मागविण्यासाठी आवाहन केले होते. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top