राष्ट्रीय

Blog single photo

देवेंद्र फडणवीस यांनी केले जगत प्रकाश नड्डा यांचे

20/01/2020

नवी दिल्ली, 20 जानेवारी (हिं.स) भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जगत प्रकाश नड्डा यांचे अभिनंदन केले. ट्विटर द्वारे अभिनंदन करताना फडणवीस म्हणाले," भारतीय जनता पक्षाचे यशस्वी कार्याध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रकडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. " 

सोमवारी नड्डा यांच्या समर्थनार्थ प्रस्ताव सादर करण्यासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यसह खासदार पूनम महाजन, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे , माजी खासदार किरीट सोमैय्या, विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप प्रमुख आणि आमदार मंगल प्रभात लोढा आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top