राष्ट्रीय

Blog single photo

जगन मोहन रेड्डी यांनी लावली विशेष सीबीआय न्यायालयात हजेरी

10/01/2020

हैदराबाद , 10 जानेवारी (हिं.स.) : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी शुक्रवारी हैदराबाद येथे विशेष सीबीआय न्यायालयात हजेरी लावली. जगन मोहन रेड्डी सध्या कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चौकशीला सामोरे जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळल्या नंतर जगन मोहन रेड्डी पहिल्यांदाच सीबीआय न्यायालयात हजेरी लावली. यापूर्वी प्रशासकीय कामाचा दाखल देत वैयक्तिक हजेरीपासून सूट मिळवण्यासाठी रेड्डी यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयात ती फेटाळून लावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारी ला घेण्यात येणार आहे. 

 नोव्हेंबर महिन्यापासून एकूण दहा शुक्रवारी हजर न राहण्याची जगन मोहन रेड्डी यांनी विनंती केली होती 2018 साली सप्टेंबर महिन्यात रेड्डी यांनी विशेष सीबीआय न्यायालयात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्यावर विशाखापट्टणम विमानतळावर एका युवकाने टोकदार शास्त्राने हल्ला केला होता. अमरावती ते हैदराबाद यासर्व प्रवासावर आणि एकूण कार्यक्रमावर एकूण 60 लक्ष खर्च असलयाचे समजते. कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात 2013 साली रेड्डी यांना जामीन मिळाला होता. त्यापूर्वी या प्रकरणार त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता.
हिंदुस्थान समाचार 


 
Top