राष्ट्रीय

Blog single photo

सत्य, संवाद आणि सेवा हे पत्रकारितेचे मूळ भाव : खासदार आर.के. सिन्हा

08/01/2020

वाराणसी, 08 जानेवारी (हिं.स.) : सत्य, संवाद आणि सेवा हे हिंदुस्थान समाचारचे ध्येय वाक्य असून या
तीन शब्दांसोबत आम्ही सेवाभाव ठेवून कार्यरत आहोत असे प्रतिपादन भाजपचे राज्यसभा
खासदार आणि हिंदुस्थान समाचारचे प्रमुख रवींद्र किशोर सिन्हा यांनी केले.
हिंदुस्थान समाचार विकास
संवाद-3
या
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 

माध्यम आणि पत्रकारिता
क्षेत्रावर बोलताना खासदार सिन्हा म्हणाले की
, सत्य, संवाद आणि सेवा हे पत्रकारितेचे मूळ भाव असून याच्याशिवाय
पत्रकारितेस अर्थच नाही. ते म्हणाले की
, आणीबाणीच्या
काळात मोठमोठे लोक
, वर्तमानपत्र झुकले परंतु
हिंदुस्थान समाचारने कधी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. आजच्या काळातील
पत्रकारांनी देखील ही मूल्य पाळली पाहिजेत.
 

हिंदुस्थान समाचार ही देशातील
पहिली वृत्तसंस्था आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात विदेशी संस्था कार्यरत होत्या
, त्यांची कार्य करण्याची पद्धत विदेशी होती. देशाचे पहिले
गृहमंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री वल्लभ भाई पटेल यांनी स्वदेशी समाचार
संस्था निर्माण व्हावी असा विचार मांडला होता आणि
1948 साली
हिंदुस्थान समाचारची सुरवात झाली. रायटर ने पीटीआई संस्था उभारली परंतु त्यांनी
त्या भावनेने कार्य केले नाही. याउलट हिंदुस्थान समाचार संपूर्णतः भारतीय
विचारधारेवर आधारित संस्था होती आणि यामध्ये पत्रकारांची महत्वाची भूमिका राहिली.
 

सिन्हा पुढे म्हणाले की
मोठ-मोठ्या गोष्टी न करता विकासात सगळ्यांचा सहभाग असावा. काम योग्य आणि उत्तम
प्रकारे कशा प्रकारे झाले पाहिजे यासाठी वेळोवेळी अशा संवाद कार्यक्रमांचे आयोजन
केले जाते. याद्वारे नीती तयार करणारे आणि समाजातील संबंधित नागरिक आपले विचार
ठेवू शकतात.
 

शिक्षण, रोजगार आणि पर्यटन या विषयावर आयोजित उत्तर प्रदेश विकास
संवाद-
3 कार्यक्रमाचे बुधवारी स्थानिक महात्मा
गांधी काशी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात वैदिक
मंत्रोच्चारणा द्वारे उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्जवलन केले आणि हिंदुस्थान
समाचारचे संस्थापक स्व. शिवराम शंकर उपाख्य दादा साहेब आपटे
, स्व. बापूराव लेले आणि हिंदुस्थान समाचारला पुनरूज्जीवीत करणारे
स्व. श्रीकांत जोशी यांच्या तैलचित्रांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली तसेच
मान्यवरांचे पुष्पगुच्छ व अंगवस्त्र प्रदान करून स्वागत करण्यात आले.
 

यावेळी प्राथमिक शिक्षण राज्य
मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. सतीश द्विवेदी
, पर्यटन, धमार्थ आणि संस्कृती राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.
नीलकंठ तिवारी
,वाराणसी विकास प्राधिकरणाचे
सचिव आणि काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिंह
, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि मुख्य वक्ता मनोजकांत, महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसीचे कुलगुरु प्रो. टी.एन. सिंह, वीर बहादुर सिंह पूर्वांचल विश्वविद्यालय, जौनपुर चे कुलगुरु प्रो. राजाराम यादव, कटजी इंस्टीट्यूट चे निदेशक एसके अग्रवाल, हिंदुस्थान समाचारचे उपाध्यक्ष अरविंद मार्डीकर आणि
संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्या सुषमा अग्रवाल यांच्यासह इतर मान्यवर
प्रामुख्याने उपस्थित होते.
 

 हिंदुस्थान समाचार 


 
Top