राष्ट्रीय

Blog single photo

खासदार गल्ला जयदेव यांना जामीन मंजूर

21/01/2020

अमरावती , 21  जानेवारी (हिं.स.) तेलुगू देसम पार्टीचे
नेते आणि गुंटूरचे खासदार गल्ला जयदेव यांना मंगलागिरी दंडाधिकारी न्यायालयातून
जामीन मंजूर करण्यात आला आहे. तीन राजधानीच्या निर्णयाच्या विरोधात  जयदेव अमरावतीत प्रदर्शन करीत होते. त्यावेळी
पोलिसांनी त्यांना अटक करीत ताब्यात घेतले होते. सोमवारी रात्री आंध्रप्रदेश
विधानसभेत बहुचर्चीत आणि वादग्रस्त आंध्रप्रदेश विकेंद्रीकरण आणि एकत्रित विकास
विधेयक
2020 पारित करण्यात आले. यामुळे आता राज्यात तीन राजधानी
निर्माण करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

खासदार गल्ला जयदेव
यांच्या अटकेवर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचेअध्यक्ष चंद्रबाबू नायडू
यांनी तीव्र विरोध दर्शवीत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि  वायएसआर काँग्रेसचे  प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्यावर टीका केली.
त्याचा प्रमाणे विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन देखील केले. तेलुगू देसम
पार्टीच्या अठरा आमदारांना गोंधळ करत असल्यामुळे निष्काषित केले आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि  वायएसआर
काँग्रेसचे  प्रमुख जगन मोहन रेड्डी
यांच्या तीन राजधानी निर्णयामुळे  राज्यात
विविध भागात आंदोलने होत आहे. वायएसआर काँग्रेस सरकार अमरावतीला दुय्यम दर्जा
देण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचा आरोप 
विरोधी तेलुगू देशम पक्षकाडून केला जातो आहे.

खासदार गल्ला जयदेव यांना
पोलिसांकडून जोरदार मारहाण झाल्याचा आरोप 
तेलुगू देसम पार्टीचे लावला आहे. चंद्रबाबू नायडू  सहित खासदार राम मोहन नायडु
, केसिनेनि नानी
आणि इतर आमदार आणि नेत्यांनी जगन मोहन रेड्डी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे.
एका व्हिडीओ द्वारे गल्ला जयदेव यांना झालेल्या जखमांबाबत माहिती देण्यात आली.
सामाजिक माध्यमांवर सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध टीडीपी समर्थकांकडून केला जातो
आहे. स्वतः माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचेअध्यक्ष चंद्रबाबू नायडू
यांनी यात पुढाकार घेतला आहे
.हिंदुस्थान समाचार


 
Top