राष्ट्रीय

Blog single photo

अर्थसंकल्पाच्या पार्श्र्वभूमीवर सीतारामन यांनी घेतली महत्वाची बैठक

09/01/2020

नवी दिल्ली, 9 जानेवारी (हिं.स.) आगामी 2020-21च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्र्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी भाजपच्या केंद्रीय कार्यलयात महत्वाची बैठक घेतली. सीतारामन यांनी पक्षाच्या विविध मोर्चाचे पदाधिकारी, प्रवक्ते आणि इतर संबंधित पदाधिकाऱ्यांशी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यांच्यकडून सूचना आणि कल्पना जाणून घेतल्या.


 2020-21चा अर्थसंकल्प 1 फेबृवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. सध्या सीतारामन अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक जगतातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत आहेत.  2020-21च्या अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून सूचना तसेच अभिनव कल्पना मागविण्यासाठी आवाहन केले आहे. इच्छुक नागरिक माय गोव्ह www.mygov.in या संकेत स्थळावर जाऊन अर्थसंकल्पासंदर्भात आपले विचार मांडू शकतात. सूचनादेण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2020 आहे. 

हिंदुस्थान समाचार


 
Top