राष्ट्रीय

Blog single photo

' मन की बात ' 2019 चे भाग एका क्लीकवर

06/01/2020

नवी दिल्ली, 6 जानेवारी (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद मोदींचा बहुचर्चीत रेडिओ कार्यक्रम ' मन की बात ' 2019 चे सर्व भाग आता एका क्लीकवर ऐकता येणार आहे. मन की बात कार्यक्रमसंबंधी नागरिकांना माहिती पुरवण्यासाठी एक विशेष ट्विटर हॅन्डल सुरु करण्यात आले असून याद्वारे मन की बात कार्यक्रमाबाबत विविध माहितीत सामाजिक माध्यमांवर उपलब्ध होणार आहे. याचा भाग म्हणून मन की बात चे नऊ भाग एका ट्विटद्वारे यु-ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. 

 ' मन की बात 'च्या डिसेंबर महिन्याचे प्रसारण रविवार 29 डिसेंबर रोजी करण्यात आले 'मन की बात ' चे आतापर्यंत 60 भाग प्रसारित झाले आहेत. गेल्या चार वर्षपासून इंटरनेट आणि डिजिटल माध्यमाच्या वाढत्या प्रभावात रेडिओ सारख्या प्रभावी संवाद माध्यमाचा वापर करून जनतेशी थेट संवाद प्रस्थपित करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. 

हिंदुस्थान समाचार


 
Top