राष्ट्रीय

Blog single photo

‘सोशल मिडीया’तील अपप्रचाराविरुद्ध संघाची पोलिसात धाव

17/01/2020

नागपूर, 17
जानेवारी
 : समाजमाध्यमांमध्ये बदनामीकारक आणि
भ्रमित करणा-या पोस्टच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कठोर पवित्रा घेतला
आहे. यासंदर्भात संघाने शुक्रवारी नागपुरातील कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली
आहे. संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेला महानगर संघचालक राजेश लोया आणि प्रांत
संघचालक राम हरकरे प्रामुख्याने उपस्थित होते.यासंदर्भात माहिती देताना
श्रीधर गाडगे यांनी सांगितले की
, गेल्या काही दिवसांपासून सोशल
मिडीयामध्ये संघाच्या विरोधात अपप्रचार करणारी पोस्ट व्हायरल होते आहे. या
पोस्टमधील माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघा येत्या 21 एप्रिलपासून देशाचे
संविधान बदलणार असून यासंदर्भात संघाने नवीन संविधानासाठी जनतेकडून सूचना
मागवल्याचे देखील हिंदी भाषेतील त्या पीडीएफ पाईलमध्ये नमूद आहे. ही पोस्ट अतिशय हास्यास्पद
असून संघ कधीही देश विरोधी कृती करीत नसल्याचे गाडगे यांनी सांगितले.भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी
जगभरातील ज्ञानस्त्रोतांचा अभ्यास करून बनवलेल्या संविधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाची पहिल्या दिवसापासून निष्ठा आहे. राष्ट्रगीत
, राष्ट्रगान,
संविधान याचा आम्ही नितांत आदर करतो. परंतु, संघाला
बदनाम करण्यासाठी आणि देशातील नागरिकांमध्ये भ्रम पसरवण्याच्या हेतूने कुठ्यातरी
कुटिल व्यक्ती किंवा संस्थेने अशा प्रकारच्या पोस्ट तयार करून खोटा प्रचार सुरू
केलाय. त्यामुळे या विरोधात आज
, शुक्रवारी कोतवाली पोलिस
ठाण्यात संघातर्फे पोलिस तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती गाडगे यांनी दिली.
तसेच जनतेने अशा खोट्या आणि भ्रामक पोस्ट पासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी
केले.दरम्यान संघाचे नागपूर महानगर
कार्यवाह अरविंद कुकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसात भादंविचे कलम
124
, 153-अ, 153-ब, 295-अ
आणि 505 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाचे कलम 66 फ
, 67
अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.हिंदुस्थान समाचार 


 
Top