राष्ट्रीय

Blog single photo

जेएनयु हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल

06/01/2020

नवी दिल्ली, 06 जानेवारी (हिं.स.) : जेएनयु कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या बुरखाधारी हल्लेखोरांच्या विरोधात सोमवारी सकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. त्याआधारेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुरखाधारी हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

 केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी जेएनयूतील हिंसाचाराच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्लीचे नायब राज्यपाल तसेच पोलीस आयुक्तांकडे तातडीने याबाबत अहवाल मागितला आहे. दुसरीकडे एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना उपचारानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. एम्सकडून याबाबत एक बुलेटिन जारी करण्यात आले असून 34 विद्यार्थी रुग्णालयात दाखल होते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top