मनोरंजन

Blog single photo

'राम सेतु'च्या सेटवर 45 जणांना कोरोनाची लागण

05/04/2021

मुंबई, ०५ एप्रिल, (हिं.स.) : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पाठोपाठ आता 'राम सेतु' या चित्रपटाच्या सेटवर 45 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.


आज मडमधील 'राम सेतु'च्या सेटवर 100 जण कामाला सुरुवात करणार होते. मात्र, अक्षयला कोरोनाची लागण झाल्याने या सिनेमाचा भाग बनणाऱ्यांसाठी कोरोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. यात 100 जणांपैकी 45 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अक्षयसह 45 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 15 दिवस शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

राम सेतु चित्रपटाची संपूर्ण टीम सर्व प्रकारची खबरदारी बाळगत आहे. ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या 45 लोकांना कोरोनाची लागण झाली असून ते सर्व क्वारंटाइन असल्याची माहिती फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंड‍िया सिने एंप्लॉइजचे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 
Top