क्षेत्रीय

Blog single photo

माघवारी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न

23/02/2021

 सोलापूर 23 फेब्रुवारी (हिं.स)


माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठलाची पूजा मंदीर समितीच्या सदस्या ऍड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली. रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी मंदीर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, मंदीर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
माघवारी जयाशुध्द एकादशी निमित्त मंदिरात वतीने आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. 

 हिंदुस्थान समाचार 
Top