मनोरंजन

Blog single photo

प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान कालवश

01/06/2020

मुंबई, १ जून (हिं.स.) : बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान (४३) यांचे रविवारी (31 मे) रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईच्या चेंबूरमधील सुरराणा सेठीया रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किडनी आणि घशामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे मागील काही महिन्यांपासून ते रुग्णालयातच होते.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकाराचे निधन झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये दुःखद वातावरण आहे. प्रियंका चोप्रा, वरूण धवन आणि प्रणिती चोप्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी दुख व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी इरफान खान आणि ॠषी कपूर यांचे निधन झाले होते. आता वाजिद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

किडनी आणि घशाच्या इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या वाजिद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचीही चर्चा होती. मात्र निधन कशामुळे झाले याबाबत डॉक्टर किंवा नातेवाईकांकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आले नाही. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. वाजिद यांना मागील वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.

1998 मधील सलमान-काजोल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाद्वारे साजिद-वाजिद यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर वाजिद यांनी साजिदच्या साथीने सलमान खानच्या तेरे नाम, मुझसे शादी करोगी, पार्टनर, हेलो, गॉड तुस्सी ग्रेट हो, वॉण्डेड, वीर, दबंग, एक था टायगर, नो प्रॉब्लम या सांरख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं.


साजिद-वाजिद यांनी क्या यही प्यार है, किलर, शादी करके फंस गया यार, चोरी-चोरी, कल किसने देखा, तुमको न भूल पाएंगे, जाने क्या होगा, कल किसने देखा इत्यादी चित्रपटांनाही संगीत दिलं. याशिवाय सारेगामापा या म्युझिकल कार्यक्रमाशीही ते अनेक वर्ष जोडले होते.


हिंदुस्थान समाचार


 
Top